Skip to product information
1 of 1

11 रुल्स फोर लाइफ ( यशस्वी जीवनाची रहस्य ) लेखक: चेतन भगत Chetan Bhagat

11 रुल्स फोर लाइफ ( यशस्वी जीवनाची रहस्य ) लेखक: चेतन भगत Chetan Bhagat

Regular price Rs. 320.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 320.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Quantity

11 रुल्स फोर लाइफ ( यशस्वी जीवनाची रहस्य ) लेखक: चेतन भगत 

प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवं, असं काही.


उन्हाळ्यातल्या एका दुपारी विराज या 'फूड डिलिव्हरी' करणाऱ्या तरुणाने लेखक चेतनसाठी दुपारचं जेवण आणलं होतं. त्याला पोहोचायला उशीर झाला. तो चांगलाच विमनस्क मनःस्थितीत दिसत होता. 'काय झालं?' असं चेतनने विचारताच विराजच्या भावनांचा बांध फुटला. तो म्हणाला, "मला माझ्या आयुष्याचा तिरस्कार वाटतो. माझ्या कारकिर्दीत काहीही चांगलं घडत नाही. माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली. मला काही भविष्यच नाही." हे ऐकल्यावर लेखकाने विराजसमोर एक प्रस्ताव मांडला. लेखक म्हणाले, "हे सगळं ताळ्यावर आणायला मी तुला मदत करू शकतो. मी रोज दुपारच्या जेवणाची ऑर्डर देईन, तेव्हा तूच ते घेऊन ये. जीवनाबद्दल मला जी गुपितं समजली आहेत, ती मी तुला दर दिवशी एकेक करून सांगेन."

जीवनाच्या या ११ नियमांमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे कुठलीच आडकाठी नाही. हे पुस्तक तुमच्या आयुष्यात रूपांतरण घडवेल. आजवरच्या पुस्तकांपेक्षा या पुस्तकात आपल्या अत्यंत वैयक्तिक अनुभवांचा समावेश करत चेतन आपल्यासमोर स्वतःचं यश आणि अपयश मोकळेपणाने मांडतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थानावर पोहोचलेल्या यशस्वी लोकांशी साधलेले संवाद, तसंच मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून गेली दोन दशकं असलेला अनुभव, या साऱ्यांबद्दल ते या पुस्तकात बोलतात.

ज्या शैलीमुळे चेतन आज भारताच्या सर्वांत लाडक्या लेखकांपैकी एक ठरले आहेत, तीच शैली इथेही दिसते. ती प्रेरणादायी तर आहेच; शिवाय, वाचायला अतिशय सोपी आहे. ती आपल्याशी थेट संवाद साधत आपल्याला मार्गदर्शन करते, ज्यायोगे आजच्या अत्यंत स्पर्धात्मक आणि अन्यायकारक जगात यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेंदूची पुनर्जोडणी करणं, त्याला 'रिवायर' करणं शक्य होईल.

आपलं सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी तयार आहात ना ?

जर एखादं पुस्तक तुमचं आयुष्य बदलू शकणार असेल, तर हेच ते.
View full details